जगातील पहिल्या Flying Race Car ने घेतली गगन भरारी, पाहा व्हायरल फोटो…

इलेक्ट्रिक आणि सेल्फ ड्रायव्हिंग वाहने जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच Flying Car देखील वाहन उद्योगक्षेत्रात आपले स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करताना दिसत आहे. याच धर्तीवर ऑस्ट्रेलियन कंपनी Alauda Aeronautics ने काम सुरू केले आहे. ही कंपनी लवकरच एक Flying Race Car लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

scs

Alauda Aeronautics ने नुकतेच दक्षिण ऑस्ट्रेलियात Alauda Mk3 फ्लाइंग कारची टेस्टिंग केली आहे. जी 2021 मध्ये जागतिक स्तरावर आयोजित होणाऱ्या तीन फ्लाइंग कार रेसच्या Airspeeder EXA रेंजला फॉलो करेल. Alauda Mk3 या कारला याच वर्षी फेब्रुवारीत जगासमोर सादर करण्यात आलं होतं. नुकतेच या कारला पहिल्यांदाच उड्डाण करताना पाहिलं गेलं आहे.

untitled-2-copy

Alauda Mk3 कार सिम्युलेटरद्वारे लांबूनही नियंत्रित केली जाऊ शकते. Mk3 कॉकपिट वातावरणाची गतिशीलता आणि अर्गोनॉमिक्स कॉपी करते. Alauda Mk3 ही कार 1950 ते 1960 च्या रेसिंग कारच्या डिझाइनशी प्रेरित आहे. ही फ्लाइंग कार इलेक्ट्रिक वर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग करण्यास देखील सक्षम आहे.

आपली प्रतिक्रिया द्या