Hyundai Creta किमतीत वाढ, खरेदीसाठी मोजावे लागतील जादा पैसे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाहन उत्पादक कंपनी ह्युंदाई लवकरच सेवन सीटर एसयूव्ही Alcazar हिंदुस्थानी बाजारात लॉन्च करणार आहे. ही एसयूव्ही ह्युंदाईच्या लोकप्रिय Creta एसयूव्हीवर आधारित आहे. कंपनीने आता Creta च्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला ही एसयूव्ही खरेदी करण्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहे. या एसयूव्हीची मागणी हिंदुस्थानात वाढली आहे. अशातच सर्व्हिस कॉस्ट वाढल्याने याचा परिणाम या एसयूव्हीच्या किंमतीवर झाला आहे.

ही एसयूव्ही 1.5 लिटर पेट्रोल, 1.4 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिनच्या पर्यायसह उपलब्ध आहे. या सर्व इंजिनसह 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मानक आहे. यात 6-स्पीड स्वयंचलित आणि 7-स्पीड डीसीटी गियरबॉक्सचा पर्याय देखील देण्यात आला आहे. या एसयूव्हीत पॉवर-एडजेस्टेबल ड्राइव्हर सीट आणि हवेशीर फ्रंट सीट्स, कनेक्ट कार तंत्रज्ञानासह 7 इंचाचा सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारखे फीचर्स देण्यात आले आहे.

किती वाढली किंमत?

नवीन Creta च्या डिझेल व्हेरिएंटची किंमत 19,600 हजार रुपयांनी वाढली आहे. तर याच्या पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 13,600 हजार रुपयांनी वाढली आहे. आता पेट्रोलमध्ये या एसयूव्हीच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 17,67,400 असेल. तसेच डिझेल इंजिनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 10,51,000 आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 17,62,400 ठेवण्यात आली आहे.