Jeep Compass Night Eagle Edition हिंदुस्थानात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

2775

वाहन निर्माता कंपनी jeep ने हिंदुस्थानी बाजारात आपली नवीन Jeep Compass Night Eagle Edition लॉन्च केली आहे. कंपनीचा हा मॉडेल ब्राझील आणि यूके सारख्या काही जागतिक बाजारात विक्रीसाठी आधीच उपलब्ध आहे. आज आम्ही तुम्हाला याच एसयूव्हीच्या फीचर्स आणि किंमत बद्दल सांगणार आहोत.

Jeep Compass मध्ये दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. यात पहिले 1956 सीसी डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 3750 आरपी येथे 173 बीएचपी आणि 1750-2500 आरपीएमवर 350 एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच याच्या पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 1368 सीसीचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 5500 आरपीएम वर 160 बीएचपी आणि 2500-4000 आरपीएमवर 250 एनएम टॉर्कची जनरेट करते. तसेच यात एसयूव्ही मॅन्युअल ट्रांसमिशन आणि स्वयंचलित ट्रांसमिशन पर्याय देण्यात आले आहे.

किंमत

Jeep Compass Night Eagle Edition पेट्रोल व्हेरिएंटची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 20.14 लाख रुपये. 4×2 डिझेल मॅन्युअल व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 20.75 लाख रुपये आहे

आपली प्रतिक्रिया द्या