एमजी मोटरची नवीन सहा आसनी इंटरनेट एसयूव्ही ‘हेक्टर प्लस’ लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

1365

एमजी (मॉरीस गॅरेज) मोटर इंडियाने आपली नवीन एमजी हेक्टर प्लस हिंदुस्थानी बाजारात लाँच केली आहे. हेक्टर प्लस हिंदुस्थानातील पहिली सहा आसनी इंटरनेट एसयूव्ही असून ती पॅनोरमिक सनरूफसह येत आहे. आज आम्ही तुम्हाला याच एसयूव्हीच्या किंमत आणि फीचर्स बद्दल सांगणार आहोत.

या सहा आसनी हेक्टर प्लसमध्ये उत्कृष्ट आणि आरामदायी कॅप्टन सीट्स देण्यात आल्या आहेत. 6-सीटर एसयूव्ही ही नव्या ड्युएल-टोन स्मोक्ड सेपिया ब्राउन इंटेरिअरमुळे आतून खूप अपिलिंग लूक देते. नव्या स्टायलिश हेडलँप्ससह, एक नवे क्रोम-स्टडेड फ्रंट ग्रिल आणि आय-स्मार्ट नेक्स्ट जनरेशनसाठी चिट-चॅट फीचर यामुळे गाडीचे आकर्षण वाढले आहे. यात आणखी आकर्षक सुविधा असून त्यात नवे स्मार्ट स्वाइप, फ्रंट आणि रिअर बम्पर्स, न्यू रिअर टेल लाइट डिझाइन आणि रिवाइज्ड स्किड प्लेट्स आहेत. कंपनी एमजी शील्ड अंतर्गत, एमजी फ्री-तीन, ‘5एस’, म्हणजेच फ्री 5-वर्ष/ अनलिमिटेड किमी वॉरंटी, फ्री 5-वर्षीय रोडसाइड असिस्टंस आणि पहिल्या 5 सर्व्हिससाठी फ्री लेबर चार्जचा विस्तार करण्यात आला आहे.

किंमत

कंपनीने या एसयूव्हीची किंमत 13.48 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या