‘ही’ आहे हिंदुस्थानातील सर्वाधिक रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर, एका चार्जमध्ये गाठणार 240 किमीचा पल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढताना दिसत आहे. अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपली इलेक्ट्रिक कार-स्कूटर बाजारात सादर करताना दिसत आहेत. अशातच जास्त रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आतापर्यंत फक्त Bajaj Chetak आणि Tvs iQube या दोन स्कॉउटरचे नाव घेतले जात होते. मात्र आता यांना टक्कर देण्यासाठी बेंगळुरू आधारित इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी ‘सिंपल एनर्जी’ लवकरच आपली नवीन स्कूटर बाजारात उतरवणार आहे.

शहरात होणार उपलब्ध

कंपनीने आपल्या या स्कूटरचे नाव Mark-2 असे ठेवले आहे. ही स्कूटर मे महिन्यात लॉन्च करण्याची कंपनीने योजना आखली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सिंपल एनर्जी Mark-2 देशातील ब्रँडचा फ्लॅगशिप इलेक्ट्रिक स्कूटर असेल. Mark-2 इलेक्ट्रिक स्कूटर सुरुवातीला हिंदुस्थानातील निवडक शहरांमध्ये उपलब्ध होईल. यात चेन्नई, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू आणि दिल्लीचा समावेश असेल.

सिंगल चार्जमध्ये गाठणार 240 किमीचा पल्ला

untitled-1-copy

या इलेक्ट्रिक स्कूटरच्या ड्रायव्हिंग रेंजबाबत असा दावा केला जात आहे की, एकदा संपूर्ण चार्ज केल्यानंतर इको मोडवर ही स्कूटर 240 किमीपर्यंत धावू शकेल. यात कंपनीने 4.8 किलोवॅट क्षमतेची लिथियम-आयन बॅटरीचा वापर केला आहे. तसेच याची टॉप स्पीड ताशी 100 किमी इतकी असून ही स्कूटर फक्त 6.6 सेकंदात ताशी 50 किमीचा वेग प्राप्त करू शकते, असा दावा कंपनीने केला आहे.

सध्या हिंदुस्थानात अधिक ड्रायव्हिंग रेंज देणाऱ्या स्कूटरमध्ये Bajaj Cheta, Tvs iQube आणि Ather450x उपलब्ध आहे. मात्र Mark-2 ची रेंज बाजारात उपलब्ध असलेल्या या स्कूटरपेक्षाही अधिक असेल, असे बोलले जात आहे. ही स्कूटर किंमतीच्या बाबतीत Ather 450x ला टक्कर देणार.