TVS NTorq 125 SuperSquad Edition हिंदुस्थानात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स…

हिंदुस्थानात सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. अशातच अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपली नवीन बाईक आणि कार बाजारात सादर करत आहेत. प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी TVS Motors नेही आपली नवीन TVS NTorq 125 चा लिमिटेड एडिशन ‘SuperSquad Edition’ लॉन्च केला आहे. आज आम्ही तुम्हाला याचा बाईकच्या फीचर्स आणि किंमत बदल माहिती सांगणार आहोत.

पॉवर आणि स्पेसिफिकेशन

TVS Ntorq 125 मध्ये 124.79cc चे सिंगल सिलेंडर एअर कुल्ड ओएचसी इंजिन देण्यात आले आहे. जे 7500 Rpm वर 9.4 Hp पॉवर आणि 5500 Rpm वर 10.5Nm टॉर्क जनरेट करते. याची लांबी 1865 मिमी, रुंदी 710 मिमी, उंची 1160 मिमी, एकूण वजन 116.1 किलो असून व्हीलबेस 1285 मिमी आहे. या स्कूटरच्या इंधन टाकीची क्षमता 5 लिटर आहे.

फीचर्स

TVS Ntorq 125 मध्ये एलईडी डीआरएल, हेडलॅम्प्स, ब्लूटूथ सारखे फीचर्स देण्यात आले आहे.

किंमत

कंपनीने या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 77,865 रुपये इतकी ठेवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या