
प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने नुकतीच हिंदुथानात आपली नवीन Xpulse 200 लॉन्च केली आहे. कंपनी आता आपली आणखीन एक स्पोर्ट बाईक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. आज हिरो मोटोकॉर्पने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आगामी स्पोर्ट बाईकचा एक टिझर व्हिडीओ शेअर केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, या टिझर व्हिडीओत Xtreme 160R चा नवीन स्टील्थ एडिशन दिसत असून कंपनी ही बाईक लवकरच लॉन्च करणार आहे. या टिझर व्हिडीओत ‘गो बूम इन स्टील्थ मोड’ अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. ही बाईक स्टेम ब्लॅक पेंट स्कीमसह सादर करण्यात येणार आहे. कंपनी ही बाईक नवीन ग्राफिक्स डिझाइनसह लॉन्च करू शकते.
Xtreme 160R मध्ये नवीन फीचर्स देखील पाहायला मिळू शकतात. जी बाजारात या सेगमेंटमध्ये उपलब्ध असलेल्या बाईकपेक्षा वेगळी असू शकतात. तसेच नवीन ट्रेंड अनुसार या बाईकमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी देखील मिळण्याची अपेक्ष आहे. ज्याने तुम्ही बाईक इन्स्ट्रुमेंट क्लस्टरला आपल्या फोनच्या ब्लूटूथशी कनेक्ट करू शकतात. असे असेल तरी ही बाईक लॉन्च झाल्यानंतरच याच्यासोबत मिळणाऱ्या फीचर्सबद्दल अधिक माहिती मिळू शकेल.
इंजिन
या बाईकमध्ये 163cc चे सिंगल सिलेंडर एअर कुल्ड, फ्युल इंजेक्टेड इंजिन दिले जाऊ शकते. जे 15.2 PS ची पॉवर आणि 14 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड गेअरबॉक्ससह सुसज्ज असेल. याच्या पुढील बाजूस डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम आणि डिस्क ब्रेक असे दोन्ही पर्याय दिले जाऊ शकतात. ही बाईक सिंगल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिमसह येईल.
दरम्यान, या बाईकच्या लॉन्चिंग डेट बद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र कंपनी यासंबंधित उपडेट लवकरच जाहीर करू शकते.





























































