
बंगळुरूमध्ये खेळल्या गेलेल्या IPL 2023 च्या साखळी सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने शेवटच्या चेंडूवर यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगलोर म्हणजेच RCB चा पराभव केला. आवेश खानने बाय म्हणून एक धाव घेत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. यानंतर आवेश खानने हेल्मेट जमिनीवर जोरात फेकून विजय साजरा केला, त्याच्या या कृतीसाठी त्याला फटकारलेही गेले, मात्र आता त्याला याचा पश्चाताप होत आहे.
आवेश खानने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत कबूल केले की, “त्यादिवशी जे काही घडले ती माझी उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. मात्र, यावरून त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आले.” आवेश खान म्हणाला की, “हेल्मेट जमिनीवर फेकणे ही जरा जास्तच उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. मला नंतर समजले की मी हे टाळायला हवं होतं. सर्व काही क्षणात घडले. आता मला माफ करा. मला या सर्व गोष्टी करण्याची गरज नव्हती.”
यंदाची आयपीएल माझ्यासाठी अपेक्षेइतकी चांगली राहिली नसल्याचे त्याने मान्य केले. तो म्हणाला की, “तुम्ही या आधीच्या माझ्या मागील दोन आयपीएल हंगामांची तुलना केल्यास, मला पाहिजे तसे झाले नाही. जरी माझ्यासाठी हा हंगाम चांगला नसला तरी, मी माझा इकॉनॉमी रेट चांगला राखला आहे जो 10 पेक्षा कमी आहे. मी चौथ्या किंवा पाचव्या षटकात निर्णायक षटके टाकतो आणि नंतर डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करतो.”



























































