अविनाश ढाकणे जळगावचे नवे जिल्हाधिकारी तर टेकाळे मनपा आयुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जळगाव

जळगाव जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून सोलापूर मनपाचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे. तर उदय टेकाळे हे जळगाव मनपाचे नवे आयुक्त राहणार आहेत. विद्यमान जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांची बदली झाली आहे.

सध्या जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून किशोर राजे निंबाळकर तर मनपा आयुक्त म्हणून डॉ. चंद्रकांत डांगे हे होते. निंबाळकर व डांगे यांच्या बदलीची चर्चा मागील दोन महिन्यापासून सुरू होती. दरम्यान राज्य शासनाने आज महाराष्ट्रातील काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सध्या सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत असलेले डॉ. अविनाश ढाकणे यांची जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. तर सध्याचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना कुठली पोस्टिंग देण्यात आली याबाबतची माहिती मिळाली नाही. जळगाव मनपाचे आयुक्त म्हणून महाराष्ट्र नागरी स्वच्छता अभियानाचे संचालक उदय टेकाळे यांची ही नियुक्ती शासनाने केली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज सायंकाळी जळगावात प्राप्त झाले.