सोमनाथच्या धर्तीवर बनणार राममंदिराचे विश्वस्त मंडळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येत उभ्या राहणाऱ्या भव्य राममंदिराच्या उभारणीसाठी तीन महिन्यांत न्यास (ट्रस्ट) स्थापन करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राममंदिर न्यासाचे विश्वस्त मंडळ हे गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या धर्तीवर बनवले जाणार आहे. सोमनाथ मंदिर न्यास मंडळाच्या विश्वस्तपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत. नियोजित राममंदिर हे सांस्कृतिक खात्याच्या अखत्यारित येणार आहे.

राममंदिराच्या विश्वस्त मंडळाची रचना ही सोमनाथ मंदिराच्या विश्वस्त मंडळाप्रमाणेच राहणार आहे. सोमनाथ मंदिराच्या विश्वस्तपदी सध्या सात सदस्य असून त्यात पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा समावेश आहे, मात्र राममंदिर न्यासाच्या विश्वस्त सदस्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा समावेश असणार आहे की नाही ते खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीच ठरवणार आहेत. राममंदिर न्यासाच्या विश्वस्त मंडळातील सदस्यांची संख्या मात्र अजूनही निश्चित करण्यात आलेली नाही. तीन महिन्यांत न्यास स्थापन करून विश्वस्त मंडळाची नेमणूक करण्याचे काम सांस्कृतिक आणि पर्यटन खात्यातर्फे सुरू करण्यात आले आहे.

  • राममंदिर 12 किलोमीटरच्या त्रिज्येवर पसरलेले आहे. त्या पुढील परिसरात भाविकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
  • मंदिर परिसरात विविध धार्मिक स्थळे उभारली जाणार आहेत.
  • या ठिकाणी राममंदिर होते याचे पुरावे असलेले सचित्र पुस्तक पुरातत्व खात्याकडून प्रसिद्ध केले जाणार आहे.