राम मंदिराची प्रतिकृती पुढील आठवड्यात

508
ram-mandir

हिंदुस्थानाचे लक्ष लागून राहिलेले अयोध्या येथील राम मंदिराच्या प्रतिकृती आता लवकरच देशवासियांना पहायला मिळणार आहे. पुढील आठवडयात नव्या राम मंदिराच्या प्रतिकृतीच्या डिझाईनचे सादरीकरण करण्यात येणार आहे. एकूण 67.7 एकर जागेवर निर्माण केल्या जाणा्रया या मंदिराच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले जाणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या पदाधिका्रयांना याचे सादरीकरण करण्यात येणार असून त्यातून एक प्रतिकृती निवडली जाणार आहे.

याबद्दल अधिक माहिती देताना ट्रस्टच्या एका पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात मंदिराच्या नव्या प्रतिकृतीसाठी सादरकीरण ट्रस्टकडे करण्यात येणार आहे. त्यातून एक प्रतिकृती निवडली जाणार आहे. यासाठी प्रमुख निर्माण कंपनीने अगोदरच अयोध्या येथे एका लहान टीम तैनात केलीआली असून मंदिर परिसराचे काम मिळण्यासाठी ते उत्सुक असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

भूमी पूजनासाठी पंतप्रधानांना आमंत्रित करणार

ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास यांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिराची प्रतिकृती निश्चित केल्यानंतर मंदिराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. तर या मंदिराचे निर्माण 2022 च्या राम नवमीपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पुढीलआठवड्यापासून कामाचा वेग वाढणार

ज्या ठिकाणी मंदिराच्या निर्माणाचे काम केले जाणार आहे. त्याठिकाणी सध्या साफसफाईचे काम वेगाने सुरु आहे. सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे कामाचा वेग थोडा मंदाविला असून पुढील आठवड्यापासून कामाचा वेग वाढणार असल्याची माहिती ट्रस्टसच्या एका सदस्याकडून देण्यात आली आहे. तर मंदिर निर्माणसाठी विश्व हिंदु परिषदेकडून देण्यात आलेली प्रतिकृतीचाच विचार करण्यात यावा, असे मत ट्रस्टी स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांनी व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या