अयोध्येतील राम मंदिरात ‘या’ दिवशी होणार प्राणप्रतिष्ठा

तमाम हिंदूंचे आराध्य दैवत असणाऱ्या प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर अयोध्येत बनत आहे. या मंदिराचे काम सध्या अर्ध्याहून अधिक पूर्ण झाले असून पुढील वर्षी हे मंदीर सुरू केले जाणार आहे. या मंदिराच्या लोकार्पणाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र या मंदिरातील रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जानेवारी महिन्यात होणार आहे. मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी ही माहित दिली आहे.

”राम मंदिराच्या तीन मजल्यांचं सध्या काम सुरू आहे. तळमजल्याचं काम डिसेंबर अखेर पर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.”, असे नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले.

”15 ते 24 जानेवारी या कालावधीमध्ये धार्मिक विधी होणार असून . 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत येतील आणि त्याच दिवशी प्राणप्रतिष्ठा होईल. पंतप्रधान कार्यालयाला पाठवलेल्या पत्राला उत्तर मिळाल्यानंतर ही तारीख ठरवण्यात आली आहे”, असे राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास महाराज यांनी सांगितलं