अयोध्येत चार महिन्यांत राममंदिर उभारणार, अमित शहा यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
amit-shah

अयोध्येत येत्या चार महिन्यांमध्ये राममंदिराची उभारणी केली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच निकाल दिला. त्यामुळे आता तिथे भव्य राममंदिर लवकरात लवकर उभारले जावे अशी देशातील हिंदूंची भावना आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल (सीएए) जनजागृती करण्याच्या हेतूने आज जबलपूर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेमध्ये अमित शहा बोलत होते. काँग्रेसचे लोक सीएए कायद्याला विरोध करत आहेत, पण पाकिस्तानपीडित प्रत्येक शरणार्थीला हिंदुस्थानचे नागरिकत्व दिल्याशिवाय सरकार गप्प राहणार नाही असा इशारा शहा यांनी यावेळी दिला. हिंदुस्थानी नागरिकांप्रमाणेच पाकिस्तानातून हिंदुस्थानात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध आणि ख्रिश्चन शरणार्थींचाही या देशावर अधिकार आहे आणि तो देण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही, असे शहा म्हणाले.