‘बाबरी’खाली मंदिराचे अवशेष शोधून काढले, के. के. मुहम्मद यांचे महत्त्वपूर्ण योगदान

13298

अयोध्येतील ती जागा रामलल्लाचीच असून तेथे मंदिर उभारावे असा ऐतिहासिक निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने हिंदुस्थानच्या पुरातत्व विभागाने दिलेले पुरावे मान्य असल्याचे स्पष्ट केले. बाबरी मशिदीखाली मंदिर होते हे शोधण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी पुरातत्व विभागाच्या उत्तर विभागाचे माजी संचालक के. के. मुहम्मद यांनी बजावली होती. त्यांच्या संशोधनाचे निकालात योगदान आहे.

1976 साली अयोध्येत पुरातत्व विभागाचे तत्कालीन महासंचालक बी. बी. लाल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन करण्यात आले. 2003 मध्ये बी. आर. मनी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा उत्खनन झाले. या दोन्ही टीममध्ये के. के. मुहम्मद यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. बाबरी मशिदीखाली मंदिराचे अवशेष मुहम्मद यांनी शोधून काढले.

धमक्या, कारवाईच्या भीतीने डगमगले नाहीत

बाबरी मशिदीखाली मंदिरच होते या भूमिकेवर के. के. मुहम्मद ठाम राहिले. त्यांना अनेकदा धमक्या दिल्या गेल्या, निलंबनाची कारवाई करण्याचे इशारे दिले गेले पण मुहम्मद डगमगले नाहीत.

सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत समतोल आणि योग्य निवाडा दिला आहे. पुरातत्व विभागाने केलेले संशोधन न्यायालयाने मान्य केले याचे विशेष समाधान आहे. मुस्लिम समाजाने या निकालाचे मोठय़ा मनाने स्वागत करावे आणि पाच एकर जागेवर मशीद उभारावी. – के. के. मुहम्मद

आपली प्रतिक्रिया द्या