Video – आयुष म्हात्रेने घेतली क्रिकेटच्या देवाची भेट; सचिन तेंडुलकरने विश्वविजेत्या कर्णधाराला दिले खास गिफ्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा अंडर-19 वर्ल्डकप विजेत्या संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे याने क्रिकेटचा देव, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची भेट घेतली. यावेळी सचिनने त्याला खास गिफ्टही दिले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

झिम्बाब्वे आणि नामिबीयात झालेल्या अंडर-19 वर्ल्डकपवर हिंदुस्थानने विजयी मोहोर उमटवली. मराठमोळ्या आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हिंदुस्थानच्या युवा संघाने अंतिम लढतीत इंग्लंडचा तब्बल 100 धावांनी पराभव करत सहाव्यांदा अंडर-19 वर्ल्डकप जिंकण्याचा कारनामा केला. हा पराक्रम करून हिंदुस्थानचा संघ मायदेशी परतला असून सर्व खेळाडूंवर कौतुकाचा वर्षावर होत आहे. अशातच आयुष म्हात्रे याने सचिनची भेट घेतली. त्याने स्वत: आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर या भेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये हिंदुस्थानचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि आयुष म्हात्रे याचे संपूर्ण कुटुंब एकत्र दिसत आहे. या भेटी दरम्यान सचिनने शेवटच्या कसोटी लढतीदरम्यान घातलेली खास जर्सी सही करून आयुषला भेट दिली.