
शाळेत प्रवेशासह विविध कारणासांठी लहान मुलांचेदेखील आधार कार्ड काढावे लागते. लहान मुलांचे आधार कार्ड आता घरबसल्या ऑनलाइन काढता येते.
मुलांच्या आधार कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया प्रौढांपेक्षा थोडी वेगळी असते. मुलांना निळ्या रंगाचा आधार नंबर मिळतो, जो ‘बाल आधार’ म्हणून ओळखला जातो.
ऑनलाइन अर्ज करताना मुलांचे बायोमेट्रिक तपशील नोंदवले जात नाहीत. नावनोंदणीसाठी मुलाचा स्पष्ट फोटो, मुलाचे जन्म प्रमाणपत्र सादर करावे लागते.
पालकांच्या आधार कार्डवरून इतर डिटेल्स घेतल्या जातात. अर्ज नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर नोंदणी स्लिप जनरेट होते. यात नावनोंदणी क्रमांक असतो.
फॉर्म सबमिट केल्यानंतर काही दिवसांतच नावनोंदणीच्या वेळी दिलेल्या पत्त्यावर आधार कार्ड पोस्टाद्वारे पाठवले जाते. साधारण 90 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होते.
how to apply for baal aadhaar: online process for kids under 5 years
learn how to apply for a blue-colored baal aadhaar card online for children under 5. know about required documents, birth certificate, and parent’s aadhaar details.





























































