मोदींना रोखण्यासाठी विरोधकांना मुस्लिम देशांकडून मिळतोय पैसा – बाबा रामदेव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

योगगुरू बाबा रामदेव यांनी भारतीय जनता पक्षाच्या समर्थनासाठी मैदानात उडी घेतली आहे. मोदींना रोखण्यासाठी जगभरातील मुस्लिम देशांकडून विरोधांना पैसा पुरवला जात असल्याचा आरोप बाबा रामदेव यांनी केला आहे. राजस्थानमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आले असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

गेल्या वर्षी मी कोणत्याही पक्षाचा प्रचार करणार नाही असे बाबा रामदेव यांनी म्हटले होते. परंतु बुधवारी राजस्थानमधील जोधपूर येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांनी हजेरी लावली. यावेळी बाबा रामदेव म्हणाले की, जगभरातील मुस्लिम देश विरोधकांना पैसा पुरवत आहेत. कोणत्याही प्रकारे त्यांना मोदींना पुन्हा पंतप्रधान होण्यापासून रोखायचे आहे. मोदींचा असा अपराध तरी काय आहे की सर्व लोक एकत्र येऊन त्यांना पंतप्रधान होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, असे बाबा रामदेव म्हणाले.

याआधी बाबा रामदेव यांनी आपल्या दोन्ही शिष्यांची भेट घेतली. त्यांचे एक शिष्य बाबा बालकनाथ अलवर येथून तर दुसरे शिष्य सुमेधानंद सीकर येथून निवडणूक लढवत आहेत.

दरम्यान, बाबा रामदेव हे भाजपच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी संताप व्यक्त केला. बाबा रामदेव योगगुरू नाही तर व्यापारी असल्याचे ते म्हणाले.