
फ्रेंच भविष्यवेत्ता नॉस्ट्रेडॅमस यांच्यानंतर बुल्गेरिया येथील बाबा वेंगा यांनी केलेली अनेक भाकितं खरी ठरली आहेत. त्यानंतर आता अमेरिकेतील मॅसाचुसेट्स येथील हैना कैरोल ही 19 वर्षांच्या मुलीनेही बाबा वेंगांच्या पावलावर पाऊल ठेवून भाकितं वर्तवण्यास सुरुवात केली आहे. आश्चर्य म्हणजे तिची काही भाकितं खरी ठरली आहेत.
अमेरिकेतील मॅसाचुसेट्स येथे राहणारी हॅना कॅरोल असे या मुलीचे नाव असून ती केवळ 19वर्षांची आहे. 2022 साली 28 महत्त्वाची भाकितं केली होती. त्यापैकी 10 भाकितं खरी ठरली आहेत. हॅनाने यावर्षाच्या सुरुवातीला दुसऱ्या राणी एलिझाबेथ हिच्या मृत्यूची भविष्य वाणी केली होती. जी खरी ठरली आहे. जानेवारी 2022 मध्ये तिने केलेल्या भाकितांमध्ये किम कर्दाशियन याचे ब्रेकअप, हॅरी स्टाइल आणि बियॉन्सो यांचा नवीन अल्बम, रिहाना आणि प्रियांका चोप्रा आई होणार, अशी काही भाकितं खरी ठरली आहेत.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, हॅना कॅरोलने केलेली बहुतेक भाकितं ही पॉप कल्चर किंवा सिनेमा इंडस्ट्रीशी संबंधित आहेत. ज्यावर आगामी काळात लक्ष घातले जात आहे. 2022 साठी हॅनाच्या भविष्यवाणीच्या यादीमध्ये अमेरिकन मॉडेल केंडल जेनरचा विवाह, अमेरिकन मॉडेल हेली बीबर गरोदर राहणार, गीतकार आणि गायक टायलर स्विफ्ट विवाहाची घोषणा करणार, अशा काही भाकितांचा समावेश आहे.
बुल्गेरियाच्या बाबा वांगा यांनी 20 व्या शतकात अनेक भाकितं केली होती. त्यानंतर आता 21व्या शतकात हॅना कॅरोलने केलेल्या भाकितांमुळे लोकं तिला बाबा वेंगा म्हणून संबोधत आहेत. याविषयी हॅना म्हणते की, तिला पॉप कल्चर आणि सेलिब्रिटी कलाकार यांच्यामध्ये जास्त रस आहे. म्हणूनच तिचे बहुतेक भाकितं त्यांच्याबद्दल असतात. याविर्षी तिची भाकितं खरी ठरली नाही, तरी येत्या काही वर्षांत तिने वर्तवलेली भाकितं नक्कीच खरी ठरतील, असे हॅनाचे म्हणणे आहे.


























































