चार पाय, तीन हात… उत्तर प्रदेशात जन्मलेल्या या बालकाला पाहून डॉक्टरही अचंबित

अनेकदा नवजात बाळांना एक किंवा दोन्ही हाताला सहा सहा बोटे असतात. तर कधी कधी एकमेकांना चिकटलेली जुळी मुले जन्माला येतात. असे अनेक चमत्कार आपण पाहिले आहेत. परंतु सध्या चर्चा आहे ती उत्तर प्रदेशातील मेरठमधील एक नवजात बालकाची. या नवजात बाळाला चार पाय आणि तीन हात आहेत. त्याला लाला लजपत राय मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याला पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले.

मंगळवारी मुझफ्फरनगर येथील रहिवासी असलेल्या इरफानने आपल्या नवजात मुलाला मेरठच्या लाला लजपत राय मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. इरफानचे म्हणणे आहे की, त्याचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याला आधीच तीन मुली आहेत. आता त्यांच्या घरी मुलाचा जन्म झाला. पण त्याला चार पाय आणि एक हात देखील आहे.

 

या प्रकरणी मेरठचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) डॉ. अखिलेश मोहन म्हणाले की, मुलाच्या या शारीरिक रचनेची कारणे आमची टीम शोधत आहे. परंतु हा चमत्कार नसून हे विकारामुळे होते. वैद्यकीय शास्त्रात या आजाराला जन्मजात विकार म्हणतात. कधीकधी काही मुलांमध्ये जन्मजात विकार होतात. संपूर्ण तपासणीनंतरच पुढील उपचार केले जातील. त्यामुळे कोणतीही अंधश्रद्धा बाळगू नका असं अधिकाऱ्यांनी सांगितल आहे.