लग्नाला नकार; मुलीला 6 वेळा भोसकले जामिनाला नकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीला 6 वेळा भोसकणाऱया इसमाला दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला. आरोपीची सुटका झाल्यास पीडित मुलीवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे स्पष्ट करत न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

अमोल काशीद असे अटक आरोपीचे नाव असून 9 एप्रिल 2019 रोजी त्याने तरुणीच्या घरी जाऊन तिच्या आई आणि आज्जीसमोर चाकूने भोसकले. याप्रकरणी पोलिसांनी 10 एप्रिल रोजी आरोपीला अटक केली असून तो तुरुंगात शिक्षा भोगत आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून आरोपपत्रही दाखल झाले आहे तसेच आपण गेल्या दीड वर्षांपासून तुरुंगात असून आता आपल्याला जामीन देण्यात यावा अशी विनंती करत आरोपीने हायकोर्टात अर्ज केला होता.