बालाकोट हवाई हल्ल्यात 300 दहशतवादी ठार, पाकिस्तानच्या माजी राजनैतिक अधिकाऱयाची कबुली

हिंदुस्थानी हवाई दलाने बालाकोटमध्ये केलेल्या हल्ल्यात 300 दहशतवादी मारले गेले होते, अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांनी दिली आहे.

पुलवामात दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 हून अधिक जवानांना वीरमरण आले होते. त्यानंतर हिंदुस्थानने 26 फेब्रुवारी 2019 रोजी या हल्ल्याचा बदला घेतला आणि बालाकोटमध्ये जोरदार हवाई हल्ला केला. या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले याच्या आकडय़ावरून पाकिस्तान काहीच बोलत नव्हता.

अखेर दोन वर्षांनंतर गिलाली यांनी 300 दहशतवादी ठार झाल्याची कबुली दिली आहे. हिलाली हे वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत सहभागी होतात आणि पाकिस्तानी सैन्याचा बचाव करण्याचा प्रयत्न करतात. यावेळी मात्र त्यांनी पहिल्यांदाच पाकिस्तानी सैन्यावर बालाकोटमुळे कशी नामुष्की ओढवली याची कबुली दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या