पॅरिस ऑलिम्पिकचे बलराजला तिकीट; ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवणारा पहिला हिंदुस्थानी नौकायनपटू

हिंदुस्थानचा रोईंगपटू बलराज पनवार याने ऐतिहासिक कामगिरीसह हिंदुस्थानला पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा मिळवून दिला. त्याने दक्षिण कोरियात सुरू असलेल्या एशियन ऑलिम्पिक पात्रता फेरीत पुरुष एकेरी स्कल प्रकारात तिसरे स्थान पटकावले. बलराजने 2000 मीटरची शर्यत विक्रमी 7ः01ः27 अशी वेळ नोंदत पूर्ण केली.

रोईंगच्या स्कल प्रकारात अव्वल पाच खेळाडूंना पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळणार होते. बलराजने तिसरा क्रमांक पटकावित हिंदुस्थानचा ऑलिम्पिक कोटा पूर्ण केला. मात्र सांघिक प्रकारात अरविंद सिंह आणि उज्ज्वल कुमार यांना चांगल्या कामगिरीनंतरही ऑलिम्पिकसाठी पात्र होता आले नाही. या प्रकारात पहिल्या दोन जोडय़ांनाच पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले. हिंदुस्थानने टोकियो ऑलिम्पिकमध्ये या प्रकारात सहभाग घेतला होता. उज्ज्वल व अरविंद तिसऱया स्थानी राहिल्याने ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकले नाही.

पॅरा मिश्र दुहेरीतही ऑलिम्पिकचा कोटा

रोईंगच्या स्कल मिश्र दुहेरीत पॅरा रोईंगपटू नारायण कोनगोनापाल्ले आणि अनिता या हिंदुस्थानी जोडीने तिसरे स्थान पटकावित हिंद्स्थानसाठी पॅरिस पॅरा ऑलिम्पिकचे तिकीट बुक केले. या दोघांनी 7ः50ः80 अशी वेळ नोंदवली.