खलिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या शौर्य चक्र विजेत्याची गोळ्या घालून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नव्वदच्या दशकात खलिस्तानी दहशतवाद्यांशी लढा देणारे व अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करणारे शौर्य पदक विजेते बलविंदर सिंग भिखिविंड यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. बलविंदर चालवत असलेल्या शाळेच्या गेटजवळच हल्लेखोरांनी त्यांना लक्षं केलं. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. खलिस्तानवाद्यांनीच बलविंदर यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

80च्या दशकाच्या अखेर पंजाबमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांनी उच्छाद मांडला होता. त्यावेळी बलविंदर यांनी त्यांच्या कुटुंबाला घेऊन या दहशतवाद्यांविरोधात लढा देण्यासाठी एक आर्मी तयार केली होती. त्यांनी तरण तारण जिल्ह्यातून अनेक दहशतवाद्यांना हुसकावून लावलं होतं. तसेच अनेकांचा खात्माही केला होता. त्यानंतर बलविंद, त्यांचा भाऊ अमरिंदर व त्यांच्या पत्नींना केंद्र सरकारकडून शौर्य पदक देण्यात आला होता.

शुक्रवारी सकाळी बलविंदर त्यांच्या शाळेत गेले असता तेथे दबा धरून बसलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.