
माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सत्तापालटानंतर दीड वर्षांनी बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. पुढील वर्षी १२ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होतील, अशी घोषणा बांगलादेशचे मुख्य निवडणूक आयुक्त एएमएम नसिरुद्दीन यांनी गुरुवारी संध्याकाळी केली. ५ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या सत्तापालटानंतर हसीना या देश सोडून आणि हिंदुस्थानात आल्या आहेत. तेव्हापासून मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार सत्तेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेख हसीना यांचा पक्ष पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत भाग घेऊ शकणार नाही. निवडणूक आयोगाने मे २०२५ मध्ये बांगलादेशातील सर्वात मोठ्या पक्ष अवामी लीगची नोंदणी निलंबित केली आहे. अंतरिम सरकारने पक्षाच्या प्रमुख नेत्यांना अटक केली आहे. अवामी लीगला निवडणूक लढवण्यास आणि राजकीय कार्यात सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे.
बांगलादेश निवडणूक वेळापत्रक
निवडणुकीची तारीख: १२ फेब्रुवारी २०२६
नामांकन प्रक्रिया: शेवटची तारीख: २९ डिसेंबर २०२५
नामांकनांची छाननी: ३० डिसेंबर २०२५ ते ४ जानेवारी २०२६
अपील दाखल करण्याची तारीख: ११ जानेवारी २०२६
आयोगाकडून अपील निकाली काढण्याची तारीख: १२ जानेवारी २०२६ ते १८ जानेवारी २०२६
उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख: २० जानेवारी २०२६

























































