
बांगलादेशातील मीरपूर येथील रूपनगर येथील एका कापड कारखान्यात आणि रासायनिक गोदामात भीषण आग लागली. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हे रासायनिक गोदाम एका कपड्याच्या कारखान्याला लागून होते.
कापड कारखाना सात मजली उंच आहे आणि आग त्याच्या चौथ्या मजल्यावर लागली. याबाबत माहिती देताना अग्निशमन दल आणि नागरी संरक्षण विभागाच्या मीडिया सेलचे अधिकारी तलहा बिन जस्सिम म्हणाले की, रासायनिक गोदामात ब्लीचिंग पावडर, प्लास्टिकच्या वस्तू आणि हायड्रोजन पेरोक्साइड साठवले होते. या अपघातात नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला. आग इतकी भीषण आहे की, ती विझवण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. अधिकारी आगीचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ही आग नेमकी कशालमुळे लागली याचं कारण शोधलं जात आहे.