हिंदुस्थान दौऱ्यावर सावट, बांगलादेशचे खेळाडू संपावर

575

शाकीब उल हसन, महमुद्दूलाह, मुशफीकर रहीम, तमिम इक्बाल यांच्यासह देशातील जवळपास 50 क्रिकेटपटूंनी बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या धोरणांविरुद्ध निषेध केला असून याअंतर्गत आता या खेळाडूंनी सोमवारपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही स्पर्धांमध्ये सहभागी होणार नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. क्रिकेटपटूंचे मानधन वाढावे ही त्यामधील प्रमुख मागणी आहे. बांगलादेशी खेळाडूंच्या या निर्णयामुळे मात्र आगामी हिंदुस्थान दौऱ्यावर सावट निर्माण झाले आहे. हिंदुस्थान -बांगलादेश यांच्यामध्ये 3 नोव्हेंबरपासून मालिकेला सुरुवात होणार असून यामध्ये तीन ट्वेण्टी-20 व दोन कसोटी सामन्यांचा समावेश आहे.

… तर हिंदुस्थानला मिळणार 120 गुण
बांगलादेशने हिंदुस्थान दौऱ्यावर न येण्याचा निर्णय घेतल्यास टीम इंडियाला याचा फायदा होणार आहे. सध्या जागतिक स्तरावर टेस्ट चॅम्पियनशिपअंतर्गत मालिका सुरू आहेत. त्यामुळे बांगलादेशने या दौऱ्यातून माघार घेतल्यास दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचे 120 गुण हिंदुस्थानला आयसीसीकडून देण्यात येतील.

आपली प्रतिक्रिया द्या