लोकलमध्ये सहकारी व खासगी बँक कर्मचाऱयांनाही प्रवेश

अत्यावश्यक कर्मचाऱयांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर चालविण्यात येणाऱया लोकलमध्ये आता सहकारी आणि खाजगी बँकेच्या कर्मचाऱयांनाही प्रवेश देण्यात येणार असल्याचे रेल्वेने जाहीर केले आहे. राज्य सरकारने केलेल्या विनंतीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे मध्य आणि पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.

राज्य आणि रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या परवानगीनुसार सर्व सहकारी व खासगी बँकांच्या कर्मचाऱयांना महाराष्ट्र राज्य सरकारने मंजूर केल्याप्रमाणे एकूण कर्मचाऱयांच्या 10 टक्के मर्यादेपर्यंत कर्मचाऱयांना मुंबई उपनगरी विशेष लोकलसेवेद्वारे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निवडक 10 टक्के बँक कर्मचाऱयांनी राज्य सरकारकडून स्थानकांत प्रवेशासाठी लवकरात लवकर ‘क्यूआर कोड’ ओळखपत्र प्राप्त करावे, तोपर्यंत कार्यालयीन ओळखपत्र तपासून स्थानकांवर प्रवेश देण्यात येईल. महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी अतिरिक्त बुकिंग काऊंटर सुरू केले जातील.

आपली प्रतिक्रिया द्या