1 सप्टेंबरपासून बँकेचे हे नियम बदलणार, वाचा सविस्तर बातमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येत्या बुधवारपासून बँकेच्या काही नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. जे ग्राहक बँकेच्या व्यवहारामध्ये चेकचा वापर करतात. त्यांच्यासाठी हे बदल लागू होणार आहेत.

येत्या 1 सप्टेंबरपासून काही बँकांमधील चेकच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. या नवीन यंत्रणेचं नाव पीपीएस अर्थात पॉझिटिव्ह पे सिस्टिम असं असणार आहे.

या यंत्रणेंतर्गत ग्राहकाला 50 हजार आणि त्याच्या वरील रकमांच्या चेकची माहिती आधी संबंधित बँकेला द्यावी लागणार आहे. चेक काढण्यापूर्वी सर्व तपशील बँकेच्या शाखेला किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून कळवणं अनिवार्य असणार आहे.

तपशील न कळवता चेक जारी केल्यास तो रद्द होऊ शकतो. अॅक्सिससह अन्य काही बँकांनी हे नियम बदलणार असल्याची माहिती त्यांच्या ग्राहकांना दिली आहे.

रिझर्व्ह बँकेने चेक व्यवहारांसाठी 2020मध्ये पीपीएस यंत्रणा लागू केली. या नियमानुसार बँकेच्या सर्व खातेदारांवर 50 हजार आणि वरील रकमेच्या चेकसाठी माहिती देणं बंधनकारक आहे. ही माहिती न दिल्यास चेक स्वीकारला जाणार नाही.