जुलैमध्ये 13 दिवस बँका बंद राहणार

जुलै महिन्यात देशभरात तब्बल 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये 4 रविवार आणि दोन दुसऱ्या शनिवारचा समावेश आहे. 3 जुलैला अगरतळा (खर्ची पुजा), 14 जुलैला शिलाँग (बेह दीन्खलाम), 16 जुलैला देहरादून (हरेला सण), 17 जुलैला शिलाँग (यू तिरोत सिंह पुण्यतिथी), 19 जुलैला अगरतळा (केर पूजा), 28 जुलैला गंगटोक (द्रुक्पा त्से-जी) निमित्त बँकांना सुट्टी राहील. 6, 12, 13, 20, 26, 27 जुलैला सर्व ठिकाणी बँका दुसरा-चौथा शनिवार आणि रविवारमुळे बँका बंद राहतील. बँक सुट्ट्या असूनही ऑनलाइन बँकिंग आणि एटीएमद्वारे पैसे व्यवहार करू शकता किंवा इतर कामे करू शकता. त्यात कोणतीही अडचण येत नाही.