अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक, बराक ओबामा डेमोक्रेटिक पार्टीचा प्रचार करणार

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगतदार बनला आहे. यात माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी उडी घेतली आहे. ते पुढील आठवडय़ात पेनसिल्वेनिया येथे डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार जो बिडेन यांचा प्रचार करणार आहेत. बिडेन यांच्या प्रचार यंत्रणेतील प्रवक्त्यांनी शनिवारी ही माहिती दिली. त्यावर ओबामांच्या प्रचाराचा मतदारांवर काहीच फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

ओबामा यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या दोन्ही कार्यकालात बिडेन हे उपराष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी आतापर्यंत बिडेन आणि कमला हॅरिस या डेमोक्रेटिक पार्टीच्या राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा ऑनलाईन प्रचार केला आहे. ते येत्या 21 ऑक्टोबरला पहिल्यांदाच फिलाडेल्फिया आणि पेन्सिलवेनिया येथे जनतेत सहभागी होऊन डेमोक्रेटिक पार्टीचा प्रचार करणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या