
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. 23 एप्रिल रोजी येथे मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री आणि अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार सोमवारी अर्ज भरणार आहेत. तत्पूर्वी बारामतीमध्ये समस्ता दादाप्रेमींनी लावलेल्या बॅनरची सर्वत्र चर्चा आहे.
“अजितदादांचं फक्त नाव पुरेसं, घातकी तटकरे-पटेलची गरज नाही”, असे लिहिलेले बॅनर बारामतीच्या प्रशासकीय भवनाबाहेर लावण्यात आले आहेत. त्यामुळे अजित पवार गटात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
अजितदादांचं फक्त नाव पुरेसं, घातकी तटकरे-पटेलची गरज नाही; पोटनिवडणुकीआधी बारामतीत लागलेल्या बॅनरची राज्यभर चर्चा pic.twitter.com/azJB2MPNUO
— Saamana Online (@SaamanaOnline) April 6, 2026
मुंबईहून बारामतीला जाताना अजित पवार यांच्या चार्टर्ड विमानाचा 28 जानेवारी 2026 रोजी अपघात झाला होता. बारामती विमानतळावर झालेल्या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात आता पोटनिवडणूक होत असून 23 एप्रिल रोजी मतदान होईल, तर 4 मे रोजी निवडणुकीला निकाल जाहीर केला जाणार आहे.
काँग्रेसचा बारामतीमध्ये उमेदवार जाहीर, राहुरी शरद पवारांची राष्ट्रवादी लढणार




























































