
शहराच्या पूर्वभागातील तेलगू भाषिकांचा भोंडला म्हणजेच ‘ब्रतुकम्मा’ आज मोठय़ा उत्साहात साजरा झाला. महिला व मुली यात मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. तेलगू भाषेतील गाण्यावर महिलांनी फेर धरत नृत्यही केले. सायंकाळी पूर्वभागातील अनेक मैदाने या कार्यक्रमामुळे गजबजून गेली होती.
ब्रतुकम्मा हे तेलगू भाषिक व पद्मशाली समाजातील महिला एकक्रत म्हणून साजरा करतात. आपल्या कुटुंबात जन्म घेतलेल्या मुलांना दीर्घायुष्य व आरोग्यपूर्ण जीवन लाभावे म्हणून हे क्रत भक्तिभावाने केले जाते.
ब्रतुकम्मा हे गौराईचेच दुसरे रूप आहे. नवरात्रातील अष्टमीला तिची पूजा बांधतात. झेंडू, शेवंती, गुलाब, जास्वंद यांसह अनेक प्रकारच्या पानाफुलांनी ब्रतुकम्मा सजविला जाते. तिच्याभोवती तेलगू लोकगीते व भक्तिगीते गात फेर धरत महिला नृत्य करतात.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाही सामूहिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले नव्हते. परंतु, अनेक महिला मंडळ, मुली व शाळेत, उद्यानात हा कार्यक्रम मर्यादित पण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सामाजिक नियमांचे पालन करण्यात आले.
या कार्यक्रमानंतर विसर्जनाची सोय मार्कंडेय उद्यानात करण्यात आली होती. श्री मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ व नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या वतीने स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती.


























































