
बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाच्या खेळाडूंचा वार्षिक मानधन करार जाहीर केला आहे. ऑक्टोबर 2020 ते सप्टेंबर 2021 साठी हा करार असून खेळाडूंची ‘ए+’, ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ अशा चार ग्रेडमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
‘ए+’ ग्रेडमध्ये तीन खेळाडू, ‘ए’ ग्रेडमध्ये दहा खेळाडू, ‘बी’ ग्रेडमध्ये पाच खेळाडू आणि ‘सी’ ग्रेडमध्ये दहा खेळाडू आहेत. अशा एकूण 28 खेळाडूंची यादी बीसीसीआयने जाहीर केली आहे. ‘ए+’ ग्रेडमधील खेळाडूंना 7 कोटी, ‘ए’ ग्रेडमधील खेळाडूंना 5 कोटी, ‘बी’ ग्रेडमधील खेळाडूंना 3 कोटी आणि ‘सी’ ग्रेडमधील खेळाडूंना 1 कोटी रुपये मिळणार आहे.
बीसीसीआयने जाहीर केलेल्या यादीमध्ये हिंदूस्थानच्या संघाचा कर्णधार विराट कोहली, मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचा ग्रेड ‘ए+’ मध्ये समावेश झाला आहे. ‘ए’ ग्रेडमध्ये आर. अश्विन, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, अजिंक्य रहाणे यांच्यासारख्या अनुभवी खेळाडू सामील आहेत.
‘बी’ ग्रेडमध्ये भुवनेश्वर कुमार, ऋद्धिमान साहा, उमेश यादव, शार्दूल ठाकूर आणि मयंक अग्रवालचा समावेशआहे, तर ‘सी’ ग्रेडमध्ये नवदीप सैनी, कुलदीप यादव, शुभमन गिल अक्षर पटेल यांच्यासह एकूण 10 खेळाडूंचा समावेश आहे.
ALERT: BCCI announces annual player retainership 2020-21 – #TeamIndia (Senior Men) for the period from October 2020 to September 2021.
Payment structure:
Grade A+ : INR 7 Cr
Grade A : INR 5 Cr
Grade B : INR 3 Cr
Grade C : INR 1 Crhttps://t.co/WgtmO7pIOv pic.twitter.com/ycnPcXPYJu— BCCI (@BCCI) April 15, 2021
हार्दिंकला पदोन्नती
दुखापतीतून पुनरागमन केलेल्या हार्दिक पांड्या याची चांदी झाली आहे. बीसीसीआयने हार्दिकला पदोन्नती देत त्याचा ग्रेड ‘ए’मध्ये समावेश केला आहे. तर मनिष पांडेला वार्षिक करारातून वगळण्यात आले आहे.
ग्रेडनुसार खेळाडूंची यादी –
ग्रेड ए+ – विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह
ग्रेड ए- आर. अश्विन, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या.
ग्रेड बी – ऋद्धिमान साहा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर, मयंक अग्रवाल
ग्रेड – कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चाहर, शुभमन गिल, हनुमा विहारी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज





























































