
अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या वर्गमित्राने आपल्या गर्लफ्रेंडचे नाव दुसऱ्या मित्रास सांगितल्याच्या रागातून विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार भिवंडीत समोर आला आहे. या प्रकारचा जाब विचारण्यासाठी मित्राला हॉटेलवर बोलवून मारहाण केल्याने चार मित्रांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कोकण मुस्लीम एज्युकेशन सोसायटी कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिकणारे नौशाद, साद, सुभान, तारीक हे वर्गमित्र असून दुपारी महाविद्यालयात नौशाद याने साद या वर्गमित्राच्या मैत्रिणीचे नाव दुसरा वर्गमित्र सॅमला सांगितले. त्यावरून सादचा नौशादसोबत वाद झाला होता. त्यानंतर भांडण मिटविण्यासाठी सादने व त्याच्या मित्रांनी कारीवली रोड येथील आजमी हॉटेलजवळ नौशादला रात्री बोलावले. या ठिकाणी नौशाद गेला असता साद, सुभान, तारीक व त्यांच्या आणखी एका मित्राने त्याला मारहाण केली. या वेळी त्या ठिकाणी पडलेला दगड हाती घेऊन नौशाद अन्सारी याला जखमी केले. या प्रकरणी नौशाद अन्सारीने भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


























































