Video – पुण्यात पोलीस निरीक्षकाकडून मारहाण, व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यातील गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षकपदी कार्यरत असलेल्या राजेश पुराणिक यांचा नागरिकांना मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्यानंतर तेथील नागरिकांची चौकशी करताना ही मारहाण केल्याचे सांगितले जात आहे.

पुराणिक हे पुणे पोलीस दलात गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. मागील काही दिवसांपासून पुराणिक यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. मात्र, या व्हायरल व्हिडीओमुळे पुराणिक अडचणीत आल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, एक महिन्यापूर्वी मुंढवा येथील वॉटर बारमध्ये सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली होती. यावेळी येथे रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरू असल्या कारणाने काही तरुणांना मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. यानंतर आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये पुराणिक मारहाण करत असल्याचे दिसत असून काही दिवसांपूर्वीचा हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे.