बीडचे कलेक्टर, डीन कोरोना निगेटिव्ह; प्रशासनाचा जीव भांड्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सेल्फ क्वारंटाईन झालेले बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असल्याने प्रशासनाचा जीव भांड्यात पडला आहे.

पालकमंत्री धनंजय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने बीडच्या प्रशासनात खळबळ उडाली होती. अधिकाऱ्यांच्या बैठकीत संपर्क आलेला असू शकतो, म्हणून बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अंबाजोगाईचे एसडॉओ सहित स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे डीन क्वारंटाईन झाले होते. रविवारी त्यांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.

सोमवारी पहाटे जो अहवाल प्राप्त झाला, त्यात कलेक्टर राहुल रेखावार यांच्यासहित उर्वरित अधिकारी अन वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाचा जीव भांड्यात पडला आहे.