बीड जिल्ह्यात आज 182 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात गुरूवारी 1250 जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यात 182 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत तर 1068 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. बीड जिल्ह्यात आता एकुण रूग्णांचा आकडा 10936 झाला आहे. गुरूवारी दुपारी 1250 जणांच्या प्राप्त अहवालात 182 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यातील 17, आष्टीतील 23, बीडमधील 38, धारूर 21, गेवराई 12, केज 23, माजलगाव 22, परळी 9, पाटोदा 5, शिरूर 3 तर वडवणी 9 रूग्णांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकुण संख्या 10936 झाला आहेत. त्यात बरे झालेले रूग्ण 7342 एवढे आहेत. उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 2422 एवढी आहे. गुरूवारी 197 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 290 जणांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या