
बीडमधील जवळील लोखंडी सावरगाव येथील कोव्हीड सेंटरला बाहेर आग लागल्याने एकच खळबळ उडाली होती. हे कोव्हिड सेंटर मराठवाड्यातील सर्वात मोठे कोव्हीड सेंटर आहे. सेंटर बाहेरील विद्युत पोल वर झालेल्या स्पार्किंगमुळे आजुबाजुचे गवत पेटले व त्यामुळे ही आग भडकली. त्यानंतर तातडीने अंबाजोगाई येथून अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तातडीने आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने कोव्हीड सेंटरचे नुकसान झालेले नाही मात्र आगी ने एकच गोंधळ उडाला होता



























































