बीड जिल्ह्यात आज 114 कोरोना रूग्णांची भर, 198 जणांना डिस्चार्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शनिवारी दुपारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 961 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 114 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 847 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील एकूण रूग्णांचा आकडा 11 हजार 319 वर जाऊन पोहचला आहे. 343 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

बीड जिल्ह्यामध्ये शनिवारी 961 जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यात 114 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे तर 847 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आज अंबाजोगाई 9, आष्टी 24, बीड 34, धारूर 3, गेवराई 3, केज 4, माजलगाव 16, परळी 7, पाटोदा 4, शिरूर 7, वडवणी 3 रूग्ण सापडले आहेत.

बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 11 हजार 319 जणांना बाधा झाली आहे. त्यातील 9175 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1801 जणांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी 198 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 343 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दरम्यान या आठवड्यामध्ये कोरोनाचा मृत्युदर वाढला आहे. एकुण मृत्युदर 3.03 वर जाऊन पोहोचला आहे.