बीड जिल्ह्यात 115 कोरोना पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुधवारी दुपारी प्राप्त झालेल्या 659 जणांच्या अहवालापैकी 115 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले तर 544 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. बीड जिल्ह्यात एकुण कोरोनाग्रस्तांची संख्या 11 हजार 709 वर जावून पोहचली. आज 110 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत बीड जिल्ह्यात 368 जणांचा मृत्यू झाला.

बुधवारी दुपारी 659 जणांचा अहवाल प्राप्त झाला. यापैकी 115 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे तर 544 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आज अंबाजोगाईमध्ये 8, आष्टीमध्ये 27, बीड 22, धारूर 6, गेवराई 11, केज 7, माजलगाव 8, परळी 4, पाटोदा 6, शिरूर 9, वडवणीमध्ये 7 जण आढळले. बीड जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकुण संख्या 11 हजार 709 एवढी झाली आहे. 1438 जण सध्या उपचाार घेत आहेत. 9 हजार 303 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 110 जणांना डिस्चार्ज दिला आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 368 जणांचा मृत्यू झाला आहे.