
सोमवारी रात्री 77 जणांचा अहवाल आल्यानंतर 73 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. तर दोन जण पॉझिटिव्ह आले. त्यानंतर मंगळवारी सकाळी पुन्हा 49 रूग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. बीड जिल्ह्याला या 49 जणांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे.
माजलगाव तालुक्यातील कवडगावथडीमध्ये सापडलेले दोन कोरोना रूग्ण तब्बल 40 जणांच्या संपर्कात आले असल्याची माहिती समोर आली. प्रशासनाने तातडीने पावले उचलत या 40 जणांना विलगीकरण कक्षामध्ये दाखल केले. त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. बीडवरून 36, केजवरून 8, गेवराईहून 3 तर अंबाजोगाईच्या रूग्णालयातून 2 स्वॅब तपासणीसाठी पाठवले. या 49 जणांच्या अहवालाची संपूर्ण जिल्ह्याला प्रतिक्षा आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या 11 वर गेली आहे. त्यातील एक महिला मयत आहे तर 6 जण उपचारासाठी पुण्याला स्वत:हून गेले आहेत.

























































