बीड जिल्ह्यातील बिंदुसरा धरण ओवरफ्लो, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या तीन ते चार दिवसापासून सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे बीड जिल्ह्यातील सर्वच तलाव जवळपास भरले आहेत. माजलगाव धरण 100% भरून पूर्णपणे वाहत असल्याने धरणाचे अकरा दरवाजे उघडले आहे. त्यापाठोपाठ आता बिंदुसरा धरणाच्या पाण्याची पातळीही वाढले असून हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे.

बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण आज सकाळी 100% भरले असुन ते ओव्हरफ्लो झाले आहे. हे पाणी बिंदुसरा नदीपात्रात येत असून या पाणीपातळीत केव्हाही वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या व पुररेषेतील सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी ही असे आवाहन नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर यांनी केले आहे.