बीड जिल्ह्यात आणखी 13 रुग्ण वाढले, कोरोना बाधितांचा आकडा 29 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 13 ने वाढली आहे. काल 114 सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील 4 पॉजिटीव्ह रिपोर्ट आले होते, तर 13 जणांचे रिपोर्ट प्रलंबित होते. ते सर्व 13 सॅम्पल पॉजिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता बीड जिल्ह्याची संख्या 29 झाली आहे. तसेच आज सकाळी पाठवलेल्या 32 सॅम्पलच्या अहवालाची प्रतिक्षा आहे.

बीड जिल्ह्यात अत्यंत काटेकोरपणे पालन करत नागरिकांनी कोरोना पासून बचाव केला. मात्र गेल्या काही दिवसात बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढू लागली आणि बीड जिल्ह्यात कोरोना बाधित संख्या वाढू लागली. बाधित लोकांच्या संपर्कात आलेल्या 114 जणांचे स्वब काल पाठवण्यात आले होते. त्यात काल 4 जणांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आले होते तर 13 प्रलंबित होते. ते सर्व 13 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता बीड जिल्ह्याची एकूण बाधितांची संख्या 29 झाली आहे. दरम्यान काल ज्या भागात बाधीत रुग्ण आढळून आले तेथे काही भागात जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे

दरम्यान, नव्याने आढळलेल्या 13 पॉजिटिव्ह रुग्णांमध्ये
सुर्डी ता. माजलगाव (कवडगाव थडी येथील रुग्णाच्या संपर्कातील) येथील एक, कुंडी ता.धारूर येथील एक आणि नित्रूड ता.माजलगाव येथील 11 जणांचा समावेश आहे.