बीड जिल्ह्याला पावसाने झोडपले; माजलगाव, अंबाजोगाई, गेवराईत धुवांधार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोमवारी रात्री उशिरापर्यंत पावसाने बीड जिल्ह्याला चांगलेच झोडपले. रात्रभर जोरदार पावसाने बॅटींग केली. वडवणी, बीड तालुक्यामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. तर उर्वरित जिल्ह्यामध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली. 29.3 मि.मी.सरासरीने जिल्हाभरामध्ये पाऊस पडला. अवघ्या दीड महिन्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत बीड जिल्ह्यामध्ये 52.65 टक्के पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत 336 मि.मी.पाऊस झाला आहे.

बीड जिल्ह्यामध्ये सोमवारी रात्री पावसाला सुरुवात झाली. उशिरापर्यंत जोरदार पाऊस सुरू होता. वडवणी तालुक्यामध्ये सर्वाधिक 79 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. बीड तालुक्यातही 56 मि.मी.पाऊस झाला आहे. माजलगाव तालुक्यात ४६.६७ मि.मी.पाऊस पडला आहे, अंबाजोगाईत 30 मि.मी.पाऊस झाला आहे, गेवराईमध्ये 34 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. इतर तालुक्यातही पावसाने दमदार हजेरी दाखवली आहे. यंदा खरीप पीक अत्यंत जोमात आलेले असताना पाऊस टप्प्या टप्प्याने पडत आहे. आतापर्यंत 52.65 टक्के एवढा पाऊस झाला आहे. 638 मि.मी.पावसाची वार्षिक सरासरी आहे. त्यापैकी 336.40 मि.मी.पाऊस आजपर्यंत झाला आहे. रात्रीच्या पावसाने ओढे, नाले वाहू लागले आहेत. पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. धरणामधील पाणीसाठाही आता धिम गतीने वाढू लागला आहे.

सात मंडळात तुफान पाऊस
बीड जिल्ह्यातील सर्वच मंडळामध्ये दमदार पाऊस झाला आहे. त्यापैकी 7 मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. यात तलवाडा 60 मि.मी., तिंतरवणी 53 मि.मी., वडवणी 80, कवडगाव 78, अंबाजोगाई 58, दिंद्रुड 55, तालखेड 55.