बीड जिल्ह्यात आज 196 पॉझिटिव्ह रूग्णांची भर

शुक्रवारी दुपारी प्राप्त झालेल्या अहवालामध्यें बीड जिल्ह्यात आज १९६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर ९१५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. आज ११११ जणांच्या स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला.

बीड जिल्ह्यामध्ये आज ११११ जणांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये १९६ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. तर ९१५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आजच्या अहवालामध्ये अंबाजोगाई तालुक्यामध्ये २५, आष्टीमध्ये ४०, बीड ३९, धारूर १२, गेवराई ९, केज १३, माजलगाव ८, परळी २१, पाटोदा ९, शिरूर १२ आणि वडवणीमध्ये ८ रूग्णांचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यामध्ये एकुण बाधितांचा आकडा ८९९९ वर जावून पोहचला आहे. ६२६५ जण कोरोनामुक्त झाले आहेत तर २४८० जणांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी ३०१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत २५४ जणांचा मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या