
बीड जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या धिम्या गतीने वाढतच आहे. काल जे 7 प्रलंबित अहवाल होते त्यापैकी दोघा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर पाच जणांच्या अहवालावर निष्कर्ष निघालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 49 झाला आहे. दरम्यान, आज पुन्हा 30 नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल प्रतिक्षेत आहे.
बीड जिल्हा कोरोनाग्रस्तांचे अर्धशतक गाठत आहे. कालपर्यंत 47 कोरोनाबाधितांची संख्या असलेल्या बीड जिल्ह्यात आज पुन्हा दोन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आले आहेत. प्रलंबित असलेल्या 7 अहवालापैकी दोघा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 5 जणांच्या अहवालाचा निष्कर्ष निघू शकलेला नाही अशी माहिती विषाणू संशोधन व निदान प्रयोग शाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्म जीवशास्त्र विभाग डॉ.विजय चिंचोलकर यांनी सांगितले.
‘कोरोना फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है’, वुहान लॅबमधील ‘बॅट वूमन’ शी झेंगलींचे खळबळजनक विधान
दरम्यान, 49 रूग्णांपैकी 41 रूग्ण बीडच्या जिल्हा रूग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. आज पुन्हा 30 नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. रात्री उशिरा तो अहवाल प्राप्त होणार आहे.




























































