वाल्मीक समर्थक गोट्या गित्तेसह फड गँगच्या पाच जणांवरील मकोका रद्द

परळी येथील सहदेव सातभाई यांच्या खूनाचा प्रयत्न व लुट केल्याच्या प्रकरणात बीड पोलिसांनी रघू फड गँगवर मकोकानुसार कारवाई केली होती. ही गँग वाल्मीक कराड समर्थक होती. यात सात जणांचा समावेश होता. मात्र अप्पर पोलीस महासंचालकांनी सात पैकी पाच आरोपींवरील मकोका रद्द केला आहे. यात वाल्मीक कराडचा राईट हॅन्ड असलेल्या गोट्या गित्तेचाही समावेश आहे.

गोट्या गिते हा नंदागौळ (ता.परळी) येथील रहिवासी आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे 10 ते 15 गंभीर गुन्हे नोंद असून तो सापडलेला नाही. टोळीतील गोट्या गित्ते, जगन्नाथ फड, संदीप सोनवणे, बालाजी दहिफळे, विलास गिते या पाच जणांवरील मकोका रद्द करण्यात आला आहे.

वाल्मिक कराडचा राईट हँड गोट्या गित्तेवरील मकोका रद्द; अंजली दमानिया यांचा संताप, गुन्ह्यांची यादी शेअर करत म्हणाल्या…