बीडमध्ये शिवसेनेचा आवाज, ग्रामपंचायत निवडणुकीत घोडदौड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड विधानसभा मतदार संघात शिवसेनेने आपली घोडदौड कायम राखली आहे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी मुसंडी मारली आहे, जाहीर झालेल्या 9 ग्रामपंचायत पैकी 7 ग्राम पंचायत वर भगवा फडकला आहे.

बीड मतदार संघातील 19 ग्रामपंचायत साठी मतदान झाले होते. 3 ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात बिनविरोध आल्या होत्या. आज मतमोजणीला सुरुवात झाली माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे ग्रामीण भागात प्राबल्य पुन्हा एकदा सिद्ध झाले.

त्यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या टप्प्यात शिवसेनेने मोठी मुसंडी मारली आहे. गुंद, पोखरी, वासनवाडी, जिरेवाडी, रायमोहा, टाकलवाडी, धनगर वाडी ग्रामपंचायत वर भगवा फडकला आहे.