बीड पंचायत समिती सदस्यांना शिवसेनेकडून व्हीप जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड पंचायत समिती सभापती पदासाठी सोमवारी निवडणूक होणार आहे, शिवसेनेच्या मनीषा खांडे या सदस्य सभापती साठी उभे राहणार आहेत त्यांना शिवसेनेच्या सदस्यांनी मतदान करावे असा व्हीप जारी करण्यात आला आहे.

बीड पंचायत समितीच्या सभापदी पदी कोण याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पत्नी मनीषा खांडे या सभापती पदासाठी उभे राहणार आहेत, ही लढत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी रंगणार आहे. यात आमदार विनायक मेटे गटाचे, भाजपा गटाचे सदस्य कोणाच्या पारड्यात मत टाकणार हे ही समोर येईल. दरम्यान शिवसेनेचे तीन पंचायत समिती सदस्य आहेत मकरंद उबाळे, तुळजाबाई नवले या शिवसेना सदस्यांना शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांनी शिवसेना उमेदवारांना मतदान देण्याचा व्हीप जारी केला आहे..