बीडमध्ये शिवभोजन गोरगरिबांच्या दारी

840

कोरोनामुळे लॉक डाऊन करण्यात आले आहे. या काळात कोणीही उपाशी झोपू नये, म्हणून बीड जिल्ह्यात शिवसेनेने शिवभोजन गोरगरिबाच्या दारात पोहोचते करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. बुधवारी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी शनिमंदिर परिसरातील गरिबांना जेवण पोहोचते केले. शिवाजीनगर भागातही शिवभोजन देण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. हाताला काम नाही, खिशात पैसा नाही, अशा परिस्थितीमध्ये गरीबावर संकट कोसळत आहे. अशा कुटूंबामध्ये कोणी ही उपाशी झोपू नये यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी आज नवा उपक्रम सुरू केला. शिवभोजन या गरीबाच्या दारात पोहोचते केले. शनी मंदिर, शिवाजीनगर भागातील असंख्य कुटुंबाना शिवभोजन घरी जाऊन पोहोचते करण्यात आले. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या